महिलांना मिळणार महिना 1500 रुपये

माझी लाडकी बहीण योजना:-https://jobkattamarathi.com→

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय? कुठल्या महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार? वाचा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली, या योजनेंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतील.

https://jobkattamarathi.com.

महिन्याला दीड हजार रुपये देणार

स्त्री हा कुटुंबाचा आधार असते. आता ती समाजाचा केंद्रबिंदू होते आहे. कुटुंबाचे व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढते आहे. एकहाती कुटुंब सांभाळणाऱ्या आणि कर्तबगार पुरुष घडविणाऱ्या महिलाही आपल्याला पहायवला मिळतात. वेगवेगळ्या परिक्षांच्या निकालांवेळी तर मुलींची आघाडी आता नित्याची झाली आहे. अशा आपल्या कर्तृत्ववान माय भगिनींना संधीची कवाडे खुली करणे आणि प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आमचे कर्तव्य असल्याचे सांगत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करुन त्यांअंतर्गत वय वर्षे २१ ते ६० वयोगटातील महिलांना प्रतिमाह १५०० हजार रुपये देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. या योजनेसाठी ४६ हजार कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली असून जुलै महिन्यापासून योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या राष्ट्रवादी (अजत पवार गट), शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजपाने आतापासूनच जपून पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, महिला आणि तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी महायुतीकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मध्ये प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना लागू केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. ही योजना महाराष्ट्रात लागू झाल्यास राज्याच्या तिजोरीवर वर्षाला साधारण 15 ते 20 हजार कोटी रुपयांचा भार पडेल.

या योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दारिद्र्य रेषेखालील 90 ते 95 लाख महिलांना प्रतिमहिना 1200 ते 1500 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे.दारिद्रयरेषेखालील 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिला, विधवा, परितक्त्या, घटस्फोटित महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केली जाईल. महिलांना आर्थिक दृष्ट्‍या स्वावलंबी करून त्यांची मदत करणे हा या योजनेचा उद्देश असणार आहे.

  1. महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. त्यामुळे या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारकडून महिलांना खूश करण्यासाठी त्यादृष्टीने महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. लाडली बहना योजनेने भारतीय जनता पक्षाला मध्य प्रदेश राज्य जिंकवून दिल्याने महाराष्ट्रातली विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचीच पुनरावृत्ती होण्यााची विद्यमान राज्य सरकारला अपेक्षा असल्याने महिला वर्गाला आकृष्ट करण्यासाठी राज्य सरकारकडून घोषणांचा पाऊस पाडला गेला. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तसेच महिलांसाठी पिंक रिक्षा खरेदी योजना आदी घोषणा करण्यात आल्या.

रक्षाबंधनापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्रातील महिलांना रक्षाबंधन भेट दिली जात आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सावध झालेल्या राज्यातील महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात गरीब महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना राबवण्याच्या हालचाली सुरू आहेत. याअंतर्गत गरीब महिलांना दरमहा १२०० ते १५०० रुपये दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.♠

मुख्यमंत्री लाडकी बहीण  योजना कशी असेल ?

१) महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेतानाच गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे, असे या योजनेचे उद्दिष्ट असेल.

 

२) पहिल्या टप्प्यात दारिद्र्यरेषेखालील महिलांना महिन्याला १००० ते १५०० रुपये मिळणार.

 

३) या योजनेसाठी दारिद्र्यरेषेखालील २१ ते ६० वयोगटातील महिला, विधवा, परितक्त्या व घटोस्फोटीत महिला यांचा समावेश असेल.

 

४) रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात जमा होणार.

जर महाराष्ट्रात ” लाडकी बहीण योजना महाराष्ट्र ” सुरू करण्यात आली तर महाराष्ट्रातील महिलांना यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत होऊ शकते.

 

लाडली बहन योजना महाराष्ट्र या योजनेमधून महाराष्ट्रातील महिलांना महिन्याला जर मध्य प्रदेश राज्य सरकार प्रमाणे महिन्याला १२५० रुपये दिले तर महिलांना वार्षिक पंधरा हजार रुपये होतात. त्यामुळे महाराष्ट्रात ही लाडली बहन योजना तर यातून महाराष्ट्रातील महिलांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत होऊ शकते. आपण आज महाराष्ट्र लाडकी बहन योजना 2024 बद्दल माहिती पाहणार आहे

महिलांसाठी महत्त्वाच्या योजनांची घोषणा

अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे. त्याचसोबत मुलींमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे. यात ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना पदवी शिक्षणासाठी १०० टक्के शुल्क माफ केले जाणार आहे..

या योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दारिद्र्य रेषेखालील 90 ते 95 लाख महिलांना प्रतिमहिना 1200 ते 1500 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे.दारिद्रयरेषेखालील 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिला, विधवा, परितक्त्या, घटस्फोटित महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केली जाईल. महिलांना आर्थिक दृष्ट्‍या स्वावलंबी करून त्यांची मदत करणे हा या योजनेचा उद्देश असणार आहे.

महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन चांगला निर्णय घेतला आहे

 

हि माहिती सर्वाना पाठवा

♦◊

 

Leave a Comment